ब्रेकिंग
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक काँग्रेसचा युवक संवाद; NEET घोटाळ्याविरोधात जोरदार आंदोलन  विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथे युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त युवकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शाम्भवी शुक्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा व मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते.

कार्यक्रमाची सुरुवात NEET परीक्षा घोटाळ्यामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 युवकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी प्रास्ताविक करत युवक काँग्रेसच्या भूमिका आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष पवार, किरण पाटील आणि तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या भावी कार्यक्रमांचा आढावा घेतला.

तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप घोरपडे, ज्येष्ठ नेते देवेंद्र पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव रज्जाक शेख, मौर्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, मगन भाऊसाहेब पाटील, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार तसेच युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सईद तेली यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

 नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध फ्रंटल आणि सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत, सेवादल शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष राकेश पवार, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष भगवान संदानशिव, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजू भाट, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी आणि सोशल मीडिया शहराध्यक्ष संदीप बारी यांचा सन्मान करण्यात आला.

 NEET घोटाळ्याविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा

बैठकीनंतर युवक काँग्रेसच्या वतीने मराठा मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करून NEET परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच २१ तारखेला होणाऱ्या NEET परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या कार्यक्रमासाठी चाळीसगाव विधानसभा अध्यक्ष प्रज्वल राजपूत, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, अमळनेर विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा सरचिटणीस गौरव देशमुख, जिल्हा सचिव शुभम शिंदे, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, योगेश येवले, धरणगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष भूषण भागवत, माजी शहराध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वनाथ ठाकरे, ज्येष्ठ नेते तुकाराम चौधरी, शरद पाटील, गुलाब पाटील, रऊफ पठाण, जितेंद्र चौधरी, मयूर पाटील, प्रशांत पाटील, संदीप बोरसे, चेतन पाटील, वैभव पाटील, जनार्दन पाटील, कैलास पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, अर्जुन शिंदे, सूरज पवार, राकेश जाधव, पवन जाधव, मधुकर बडगुजर, मधुकर पाटील, जीवन पाटील, हिमांशू पाटील, अतुल धनगर, राहुल राजपूत, संकेत पाटील, अजय मालचे, सलमान शेख, तौसिफ बागवान, जयेश कोळी, कुणाल पाटील, कुणाल बडगुजर, तेजस ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम  करण्यासाठी माजी शहराध्यक्ष व नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, शरद पाटील आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *