अमळनेरच्या तहसीलदारपदी उमा ढेकळे रुपेशकुमार सुराणा यांच्या निलंबनानंतर तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार ज्योती वसावे यांच्याकडे; आता उमा ढेकळे यांची नियुक्ती
अमळनेर : अमळनेरच्या तहसीलदारपदाची धुरा आता उमा ढेकळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना अमळनेर तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश प्राप्त झाले असून, लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत.
यापूर्वी उमा ढेकळे या जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. अमळनेरचे तत्कालीन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे निलंबन झाल्यानंतर तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार ज्योती वसावे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
दरम्यान, प्रशासनाकडून अमळनेर तहसीलदारपदासाठी उमा ढेकळे यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आता अमळनेरच्या महसूल प्रशासनाची धुरा त्यांच्या हाती येणार आहे. त्यामुळे महसूल विभागातील प्रलंबित कामांना गती मिळण्यासह नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांच्या निराकरणासाठी त्यांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष लागले आहे.
उमा ढेकळे यांचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता अमळनेर तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान व प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीचे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून स्वागत होत आहे.


