ब्रेकिंग
गोकुळाष्टमीनिमित्त गोशाळेत गोसेवेचा भक्तिमय सोहळा श्रीमती भानुबेन बाबुलाल शहा गोशाळेत ४ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

अमळनेर : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचे प्रतीक असलेल्या पवित्र गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोसेवा, गोमाता पूजन व धार्मिक वातावरणाने नटलेला विशेष कार्यक्रम अमळनेर येथील पळासदळे रोडवरील श्रीमती भानुबेन बाबुलाल शहा गोशाळेत शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

गोकुळाष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून या कार्यक्रमात गोमातेची विधिवत सेवा, पूजा-अर्चना व पूजन करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक तथा गोसेवक गोविंद अग्रवाल आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोसेवेच्या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

गोमातेची सेवा ही भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.माध्यमातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

गोमातेची सेवा ही भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.मानली जाते. त्यामुळे या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोसेवेचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *