ब्रेकिंग
“एआय हेच भविष्य; तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर मागे पडू” – आमदार अनिल पाटील प्रताप महाविद्यालयात ‘स्व. अजितदादा पवार’ जयंतीनिमित्त एआय तंत्रज्ञान पुरस्कार सोहळा; आदर्श शेतकरी व विद्यार्थ्यांचा गौरव

 

अमळनेर (प्रतिनिधी):

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी आणि अद्ययावत माहितीचे माध्यम असून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचे महत्त्व वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता एआयचे प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा भविष्यात स्पर्धेत मागे पडण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांनी केले.

AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते. प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिल पाटील, आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी.मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी एआय प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तृत आढावा मांडत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सी.ए. नीरज अग्रवाल आणि विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना बँकिंग किंवा ई-मेलचे पासवर्ड कुठेही शेअर करू नयेत, असा सल्ला दिला. एआयच्या माध्यमातून इंटर्नशिप, प्रकल्प आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक विद्यार्थ्याने एआयचा वापर शिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जळगावच्या प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पंडित पाटील, सहचिटणीस प्रा. व्ही. बी. मांटे, माहिती व तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

“चॅट जीपीटीसह एआयचा वापर अपरिहार्य”

मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, आज प्रशासन, शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. चॅट जीपीटीसारख्या आधुनिक माध्यमातून अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असून एआयचा वापर करता आला नाही तर आपण शेवटच्या क्रमांकावर राहू. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे. सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही एआयचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम आणि सक्षम कशी करता येईल, याचा विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘आदर्श कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त शेतकरी :

प्रकाश बडगुजर (गलवाडे)

श्रीमती लिलाबाई ठाकूर (साळवे)

किशोर पाटील (गांधली)

बापूसाहेब देवरे (वलवाडी उपनगर, धुळे)

शरद सोनवणे (धरणगाव)

एआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही गौरव

AI प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मानित विद्यार्थी :

जयश्री वासुदेव पाटील

पूनम राहुल चौधरी

हर्षल महेंद्र नेरकर

कल्याणी कैलास बडगुजर

फाल्गुनी आनंदा महाजन

रिंकू अनिल साळी

भूमिका रितेश जैन

मयुरी किशोर पवार

वैष्णवी विलास पाटील

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी HAL कौशल्य रथच्या प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. जे. शेख (अमळनेर), प्रा. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, प्रा. नलिनी पाटील, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. जितेंद्र पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *