ब्रेकिंग
अमळनेरकरांना शुद्ध पाण्याची मोठी भेट! वर्षानुवर्षे प्रलंबित जलकुंभ स्वच्छतेचा धडाका; नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेच्या कामाला अखेर वेग आला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून जलकुंभ स्वच्छतेची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभाची यशस्वी साफसफाई पूर्ण करण्यात आली असून, आता तांबेपुरा येथील जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. यानंतर शहरातील उर्वरित सर्व जलकुंभ टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ

शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या मोहिमेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांची ‘आरोग्य प्रथम’ भूमिका

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलकुंभ स्वच्छता मोहिमेस तातडीने मंजुरी दिली. “शहरवासीयांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही,” या भूमिकेतून त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत कामाला गती दिली.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे नियोजन

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवत जलकुंभ स्वच्छतेचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

दिलेला शब्द पाळला; कैलास नामदेवराव पाटील यांच्यावर नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव

नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व जलकुंभांची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी प्रथम कोर्टमागील जलकुंभाची साफसफाई पूर्ण केली आणि आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून दिलेला शब्द खऱ्या अर्थाने पाळला आहे.

तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे स्वागत करत जाहीरपणे आभार व्यक्त केले. “काम असावे तर असे!” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

जलस्रोतांच्या नियमित स्वच्छतेमुळे शहरवासीयांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नगरपरिषदेची ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *