ब्रेकिंग
अमळनेरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना अग्निशमन व बचावकार्याचे धडे! अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक; पूरमदत कार्यातील युवकांसह अग्निशमन पथकाचा सन्मान

 

अमळनेर | प्रतिनिधी

आग, पूर आणि अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य खबरदारी, प्रसंगावधान आणि तातडीने बचावकार्य करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त मेरा युवा भारत, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमळनेर अग्निशमन विभागाच्या पथकाने आग प्रतिबंधक उपाययोजना, अग्निशामक यंत्रांचा वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली.

अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक फारुख शेख, फायरमन दिनेश बिन्हाडे आणि फायरमन आकाश संदानशिव यांनी विद्यार्थ्यांना आगीचे विविध प्रकार, आग विझविण्याच्या पद्धती, अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर तसेच आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. केवळ आपत्ती आल्यानंतर मदत करणेच नव्हे, तर आपत्तीपूर्व तयारी आणि संभाव्य धोके ओळखून वेळीच उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *