ब्रेकिंग
अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान! पाचोरा येथे दिमाखात पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन – २०२६’

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नुकतेच पाचोरा येथे ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन – २०२६’ मोठ्या उत्साहात दि 10 रोजी पार पडले. या अधिवेशनात पत्रकारितेतील निष्ठावान, समर्पित आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक मा. श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना प्रतिष्ठित ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे आणि खान्देश सरचिटणीस डॉ. विजय गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते हा गौरवशाली पुरस्कार श्री. कांबळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्री. सुरेश कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ दाखवलेली निष्ठा, त्यांची उत्तम कार्यशैली आणि समाजाच्या विकासात व हितात दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाची आणि समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल आणि गौरवशाली कामगिरीबद्दल पत्रकार जगतातून, अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *