ब्रेकिंग
प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण! डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार; केक कापून व पुस्तक भेट देत पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे अमळनेर शहराध्यक्ष तथा अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने नाविन्य हॉस्पिटल येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशांत निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रशांत निकम यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. पुस्तक भेट देत सामाजिक व वैचारिक बांधिलकीचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

दरम्यान, पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते रेहान शेख व मारुती पवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिघांनाही उपस्थित मान्यवरांनी पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट, जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ. चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शहर सरचिटणीस चिंधु आप्पा वानखेडे, जाकीर शेख, संदीप सोनवणे, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, खालील पठाण, नाशिक गणेश, धोंडू पाटील, श्यामकांत भावसार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला राजकीय उत्साहासोबतच आपुलकी आणि जिव्हाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *