ब्रेकिंग
अमळनेरात २० डिसेंबरला ऑल मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेतर्फे ११ जोडप्यांचे निकाह; नावनोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत

 

अमळनेर : शहरातील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑल मुस्लिम समाजातील वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामूहिक विवाह सोहळा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला असून, संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख यांच्या अध्यक्षतेखाली ११ जोडप्यांचे सामूहिक निकाह पार पडणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळत असून, विवाहाचा अनावश्यक खर्च कमी करून समाजातील गरजू वधू-वरांना सन्मानाने संसाराची सुरुवात करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

संस्थेच्या वतीने प्रत्येक वधू-वरास पलंग सेट, कपाट तसेच संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक वधू-वराच्या कुटुंबातील शंभर-शंभर व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येते 

या सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींची नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांनी दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : ७५०७१५७७८६ / ९०४९९४९९४१

या उपक्रमासाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी व जुबेर पठाण, सचिव सैय्यद अजहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन तसेच सदस्य जाकिर शेख, हाजी मट्या खाटीक व इम्रान शेख परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *