ब्रेकिंग
जी. एस. हायस्कूलचा खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रवाना

 

अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील १७ वर्षांखालील गटातील विजयी खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील व. वा. वाचनालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या संघात कर्णधार दुर्गेश सोनवणे याच्यासह कुणाल पवार, यश मिस्त्री, अनंत संदानशिव, लक्षराज पाटील, नाविण्य धनगर, वैभव गुरव, तेजस पाटील, मयूर पाटील आणि चेतन पाटील या खेळाडूंचा समावेश आहे.

संघाला शालेय समितीचे चेअरमन अण्णासाहेब हरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक सी. एस. सोनजे, के. पी. पाटील, क्रीडा विभागप्रमुख के. आर. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील व पी. एस. काटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच संघाला मार्गदर्शन करणारे जे. व्ही. बाविस्कर आणि के. डी. साळुंखे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. जिल्हास्तरीय स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *