ब्रेकिंग
डी. आर. कन्या शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेत सकाळ व दुपार विभागात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व जाणून घेत नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, श्रीमती आर. एस. सोनवणे, श्रीमती एस. एस. देवरे, श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ लिपिक श्री. शाम पवार तसेच सकाळ विभागाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती वाय. एम. पाटील आणि दुपार विभागाचे प्रमुख वक्ते श्री. के. पी. सनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती दिली. प्रमुख वक्त्यांनी क्षेपणास्त्र विकासातील भारताचे योगदान तसेच देशाच्या वैज्ञानिक प्रगतीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वाचनात सहभाग घेतला. नियमित वाचनाची सवय जोपासण्याची आणि ज्ञानवृद्धीसाठी दररोज वाचन करण्याची शपथही घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *