ब्रेकिंग
प्रा. धनराज ढगे यांना समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

 

अमळनेर :
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. धनराज ढगे यांनी समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा डॉ सुनीता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.

प्रा. धनराज ढगे यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या संशोधनामुळे समाजकार्य विषयातील ज्ञान आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजीत भांडारकर, पदाधिकारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. धनराज ढगे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *