पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
अमळनेर : दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
झेंडावंदन कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेरचे संचालक डॉ महेश पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू होवो आणि भारत माता की जय या घोषवाक्य आणि संपूर्ण परिसर प्रफुल्लित झाला. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
. सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अभिजीतभाऊ भांडारकर, संचालिका अनुरूपा अभिजीत भांडारकर, संस्थेचे मार्गदर्शक सभासद अनिल वाणी, पालक तुकाराम माळी यांचेसह समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद वैद्य, प्राध्यापक रुंद शिक्षकेतर प्रतिनिधी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थी भूषण शिंगाणे याने देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. यामिनी तुकाराम माळी, गायत्री तुकाराम बोरसे, छाया आगळे, कामिनी स्वप्नील पाटील, रत्ना जगन खैरनार यांनी देशभक्तीपर गीत गायन केले.
तंबाखूमुक्त अभियान व नशा मुक्त अभियाना विषयी कार्यक्रम घेण्यात आला.
दुर्बल घटक विद्यार्थी चेक वितरण
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील योजनेचे लाभार्थी साधना बच्छाव .गायत्री बोरसे. मोहिनी ज्ञानेश्वर पाटील यांना आर्थिक मदत म्हणून मान्यवरांच्या हस्ते चेक देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले.



