ब्रेकिंग
जवखेडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन जनजागृती

 

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर वंदेमातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान माती वाचवा, पाणी जपा, तंबाखूमुक्ती तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. बालविवाह ही बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्यासाठी गंभीर समस्या असून, बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगितमय कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

हा बालविवाह प्रतिबंध जनजागृती उपक्रम Just Rights for Children यांच्या अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व संचालक रेणू प्रसाद जिल्हा समन्वयकआनंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त समाजासाठी जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमास सरपंच सौ. जयश्री कैलास माळी, उपसरपंच श्री. दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. न्याहळदे आप्पा, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. समाधान पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, युनियन बँकेचे मॅनेजर श्री. मयुर पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापक श्री. छगन पंढरीनाथ पाटील यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती रत्नप्रभा साळुंखे, श्रीमती रेखा पाटील, सौ. सुनिता पाटील, श्रीमती अर्चना बागुल व श्री. माधवराव ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. मुकेश पाटील सर यांनी केले.

“बालविवाह थांबवूया, बालकांचे भविष्य घडवूया” असा संदेश देत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *