महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
Featured general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
Featured 50_aachonline.org_txt general Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 6 days ago
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 7 days ago
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
Featured Latest Popular- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार
अमळनेरात सराफ बाजारातील घराला लागली आग
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश
अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात
अमळनेर:-आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम(SIR) वर काळजीने लक्ष द्या,या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या म्हणजे पुढील 20 ते 25 वर्षाची सोय असून त्यासाठी आतापासूनच चौकस राहा असे आवाहन
माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी शहर व ग्रामिण भागातील बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मार्गदर्शन करून
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेसाठी सर्वानी सज्ज व्हावे असे आवाहन केले.पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की निवडणूक आयोग दर काही वर्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवतो. त्याला SIR म्हणतात. यामध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावं यादीत वाढवणे ,मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले मतदार काढून टाकणे,नाव, पत्ता, फोटो, वय यात चूक असेल तर दुरुस्त करणे,यासाठी BLO म्हणजे Booth Level Officer घरोघरी जाऊन माहिती तपासतात,थोडक्यात SIR म्हणजे मतदार यादीची विशेष साफसफाई आणि अपडेट मोहीम आहे. बूथ कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की माझं बूथ प्लस म्हणजे माझा आणि पक्षाचा विजय आहे,बुथच्या यशस्वी कार्यकर्त्याचीच पक्षात नोंद घेतली जात असते,आपल्या बूथ वर मिळालेले मतदान म्हणजेच राजकारणातले थर्मामीटर असून मतदार यादी राजकीय भवितव्याचा आत्मा असल्याने त्या किती सक्षम करायच्या ते बूथ कार्यकर्त्यांच्या हाती आहे.पालिका निवडणुकीत आपल्याला अपयश आले पण हरकत नाही आपल्याला आपल्या चुका कळल्यात,त्या दुरुस्त करण्याची संधी आपल्याकडे आहे.SIR मोहीम देखील आपल्यासाठी संधी असून मतदार यादी चे अवलोकन करून आपल्या भागातील बीएलओ बरोबर संपर्क वाढवा.येणाऱ्या काळात मॅपिंग द्वारे दुबार नावे कोणत्याही परिस्थितीत वगळले जातील,जवळपास 32 हजार नावे मतदारसंघातुन कमी होऊ शकतील. त्यासाठी बूथ रचना पक्की करा असे आवाहन करत येणाऱ्या काळात बूथ कार्यकर्त्याला थेट एन्ट्री हे धोरण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अवलंबविणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.सुरवातीला प्रास्तविक माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तर जिल्हा प्रवक्ते योगेश देसले व तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील, जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नूतन शहराध्यक्ष चेतन राजपूत, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, जितुभाऊ ठाकूर, महिला अध्यक्ष मंदाकिनी भामरे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी, युवक ग्रामीण अध्यक्ष तारकेश्वर गांगुर्डे यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम सर व आभार सुनील काटे यांनी मानले. मेळाव्यास बाजार समितीचे सर्व आजी माजी संचालक, माजी जि प व प स चे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, सरपंच, सोसायटी चेअरमन, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख व बूथ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, शाखा अध्यक्ष व शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेर : मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते होते” असे प्रतिपादन डॉ लीलाधर पाटील यांनी केले महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संविधान जागर अभियान व मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित संयुक्त कार्यशाळेत ते बोलत होते प्रताप महाविद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या जात वर्ग व लिंगभावावर आधारित शोषणाचे मूळ शोधून शोषणतंत्र आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून उलगडून दाखवले. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानव मुक्तीचे व शोषण विध्वंसनाचे तत्त्वज्ञान मांडले. यावर उपाय म्हणून एका सुसंवादी, चिकित्सक व विवेकावर आधारित शिक्षण शिक्षण पद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला व अमलात देखील आणला. या देशातील शेतकऱ्यांच्या दुःखाला व शोषणाला वाचा फोडण्याचे काम तसेच पुरुषप्रधान जातीव्यवस्थेत शोषित असलेल्या महिलांना आवाज देणे हे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी या या तत्त्वांवर जगून प्रत्यक्ष कृतीतून संपूर्ण शोषणमुक्तीचा कृती कार्यक्रम दिल. आपल्या डोक्यात तर्क विवेक आणि चिकित्सा आणि हृदयात करुणा दया आणि मानवता यासारख्या तत्त्वांना घेऊन आदर्शवत जीवन जगणारे फुले या नवीन पिढीला समजावून सांगितल्यास एका सुदृढ व विवेकाधीष्टीत समाजाची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. महात्मा फुले यांच्या जीवनातील घटनांना जरी विशिष्ट स्थळ आणि वेळेची चौकट असली तरी त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानाला ही चौकट नाही आणि म्हणून त्यांच्या या द्विशताब्दी वर्षात या तत्त्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आव्हानही डॉ. पाटील यांनी केले.
युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले की, ” महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्षात २०o व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन, पथनाट्य, परीक्षा, गीते इत्यादी कार्यक्रम जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात राबवून सुमारे 2 लाख नागरिक, विद्यार्थी,महिला, शेतकरी, कष्टकरी यांचे पर्यंत पोहोचण्याचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले तर दिशा संदा न शिव, भारती कोळी, श्रद्धा रे रा, निवेदिता कापडणेकर, उषा देवरे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील,अशोक बिऱ्हाडे, प्रा अशोक पवार यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ हर्षवर्धन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि आपण वर्षभर महात्मा फुले विषयी जे कार्यक्रम आयोजित कराल त्यात प्रताप कॉलेजचा सहभाग असेल, मदत व सहकार्य असेल, असे सांगून कार्यशाळेच्या आयोजकांचे अभिनंदन केले.
कार्यशाळेला पाचोरा कॉलेजचे माजी प्राचार्य बी एन पाटील, प्रा सुभाष पाटील, संदीप घोरपडे,सोमचंद सदा नशिव,डॉ भारती पाटील खलील देशमुख,वसुंधरा लांडगे, रामेश्वर भदाणे, योगेश पाटील, नगरसेविका योगिता पाटील, आरती पाटील,रियाज मौलाना, भीमराव महाजन,, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ सरवदे,वाल्मीक मराठे, डी एम पाटील, ईश्वर महाजन, पुरुषोत्तम माळी, रामकृष्ण महाजन,प्रकाश महाजन,आशा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम बाबुराव ठाकरे,श्रद्धा रे रा,दिशा संदानशिव,निखिल रांजणकर, अशोक बिऱ्हाडे,,सोपान भवरे गोकुळ पाटील,,गुणवंत पवार आदींनी परिश्रम घेतले प्रा डॉ राहुल निकम यांनी आभार प्रदर्शन केले प्रताप महाविद्यालयाचे साने गुरुजी सभागृह खचून भरले होते खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या..
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न
अमळनेर (दि. २२ एप्रिल २०२६) — स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या माध्यमातून अमळनेर नगर परिषदेतर्फे कचरा वेचकांसाठी एक व्यापक कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायं. ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला.
या कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील घंटा गाडी चालक, मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी व सुपरवायजर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.
प्रशिक्षणासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त कुशाग्र फाऊंडेशनच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात नमस्ते योजना, NULM, ई-श्रम कार्ड, आधार नोंदणी, बचत गट स्थापन, घनकचऱ्यातील उद्योजकतेच्या संधी तसेच RRR केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कचरा वेचकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा होता. तसेच जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत जनजागृती करण्यात येऊन उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर तसेच युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, घनकचरा सुपरवायजर श्री. खलील शहा व राजेंद्र गोलहीत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे, अमळनेरची ठाम वाटचाल!

