दिल्ली | श्रद्धा वालकर सारखेच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे. पोलिसाना मुलीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. दिल्लीतील हरिदास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवला. आरोपीचे लग्न दुसऱ्याच तरुणीसोबत निश्चित झाले होते. परंतु प्रेयसी तरुणाच्या लग्नात अडथळा आणत होती. आरोपी साहिलने दुसरीकडे लग्न करावे असे तिला वाटत नव्हते.
दरम्यान, दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. 18 मे रोजी महरौली भागात आफताब पुनावाला नावाच्या व्यक्तीने त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आफताबने श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. यानंतर आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, तो रोज रात्री हे तुकडे जवळ असलेल्या महरौलीच्या जंगलात जाऊन टाकायचा.श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. १२ नोव्हेंबरला पोलिसांनी आफताबला अटक केली होती. आफताबने नार्को आणि पॉलीग्राफी टेस्टमध्ये श्रद्धाची हत्या केल्याचं कबूल केलं, यानंतर आफताबविरोधात दिल्ली पोलिसांनी चार्जशीटही दाखल केली