KALYAN | डोंबिवली मधील दिव्यांग तरुणीची झाली ऑलिंपिक मध्ये निवड
KALYAN – जन्मजात दिव्यांग असलेल्या सेजलने चारवर्षांपूर्वी शाळेच्या मैदानात फ़ुटबाॅलला मारलेल्या किकमुळे आज थेट तिची जर्मनीतील ऑलिंपिक मध्ये होणाऱ्या फ़ुटबाॅल स्पर्धेत निवड केली. त्यामुळे शारीरिक व्यंगापेक्षा साहस आणि ध्येय मोठे असते, हे दाखवून देणारी १८ वर्षीय सेजल म्हणजे दिव्यांगांमध्ये ऊर्जेचा स्रोतच असल्याचे दिसून आले आहे. दिव्यात राहणारी सेजल जयस्वाल ही दिव्यातीलच एका शाळेत शिकत होती. […]