November 21, 2024
देशातील सैनिक हेच माझे कुटुंब : नरेंद्र मोदी
Amazon
भारत

देशातील सैनिक हेच माझे कुटुंब : नरेंद्र मोदी


कारगिलची ही भूमी सामर्थ्याचे प्रतिक आहे. या भूमिला नमन करण्याची भावना मला पुन्हा पुन्हा येथे घेऊन येते. माझ्यासाठी मागील कित्येक वर्षापासून देशातील सैनिक हेच माझे कुटुंबीय आहेत. तुमच्यामध्ये आल्यानंतर माझी दिवाळी आणखी गोड होते. माझ्या दिवाळीचा उत्साह तुमच्याजवळ आहे. मला मागील कित्येक वर्षांपासून तुमच्यासोबत दिवाळी साजरी करता येते. हे माझे सौभाग्यच आहे, असे नरेंद्र मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले.

तुमच्या (सैनिक) शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. तुम्ही (सैनिक) सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासने ओतप्रोत असते तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

आज देशातील नागरिक स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झालेला आहे. गरीब व्यक्तीला पक्के घर, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस वेळेवर मिळतो, तेव्हा देशातील सैनिकालाही अभिमान वाटतो. सैनिकाच्या शहरात, गावात जेव्हा सुविधा पोहोचतात तेव्हा सीमेवर त्याला चांगले वाटत असते, असेही मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *