नाशिक : दिवाळी सणाचे उत्साहाचे वातावरण सर्वत्र असताना नाशिक जिल्यातील भगूरमध्ये तीन गाईंची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आहे. यामुळे बजरंग दल , विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले असून चार दिवसाच्या आत पोलिसांनी आश्वासन पाळले नाही तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळॆ ऐन दिवाळीत भगूर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
.
अशा घटना नेहमी घडतात मात्र पोलीस स्टेशनकडून तक्रार घेतली जात नाही . यापुढे अशी घटना घडली तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल . आम्हाला जिजाऊंचा वारसा आहे. कोणी आमच्या गाईला हात लावला तर त्या कसायाचे हात-पाय कापल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांना विनंती आहे कि याचा सोक्षमोक्ष चार दिवसात लावावा अन्यथा आक्रमक आंदोलन केले जाईल .
देविदास वारुंगसे, जिल्हामंत्री , विश्व् हिंदू परिषद , नाशिक