September 12, 2024
लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, पायलट शहीद
Amazon
महाराष्ट्र

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, पायलट शहीद

उत्तराखंडच्या गरुडचट्टीमधील हेलिकॉप्टर दुर्घटना ताजी असतानाचा आता आणखी एक हेलिकॉप्टर कोसळलंय. ही घटना अरुणाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी सकाळी घडली. अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट शहीद झाला. दरम्यान, केदारपासून 2 किमीच्या अंतरावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा जीव गेला होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचा आणखी एक भीषण अपघात समोर आला.

गुवाहाटीच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तूतिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर सिसिंग गाव आहे. या गावात लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य केलं जातं आहे. प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *