नाशिक: – नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथील विविध पदांची भरती प्रक्रीया संपूर्ण राज्यात सुरळीत सुरु झाली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदिप कडू यांनी दिली. विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेकरीता दि. 14 ऑक्टोबर 2022, दि. 15 ऑक्टोबर 2022, दि. 17 ऑक्टोबर 2022 व दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यातील विविध परीक्षा कें्रदावर लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीप्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची लेखी परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर व नाशिक येथील निर्देशित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यास प्रारंभ झाला असून परीक्षा सुरळीत सुरु आहेत.
दि.14 तारखेच्या झालेल्या परीक्षांमध्ये राज्यातील 28 परीक्षाकेंद्रांवर क्लर्क टायपिस्ट/डिइओ/कॅशीयर/स्टोर किपर इत्यादी पदांसाठी एकुण 7118 परीक्षार्थींपैकी 5452 विद्यार्थी उपस्थीत होते. कक्ष अधिकारी या पदासाठी 1144 परीक्षार्थींपैकी 873 परीक्षार्थीं उपस्थीत होते. शिपाई पदासाठी 4573 परीक्षार्थींपैकी 3393 परीक्षार्थीं उपस्थीत होते.