September 16, 2024
चांदवडला रिक्षा अपघात : नाशिकच्या गोरेवाडीतील एक ठार
Amazon
क्राईम महाराष्ट्र

चांदवडला रिक्षा अपघात : नाशिकच्या गोरेवाडीतील एक ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर पाचोरे फाट्यानजीक गुरुवारी पहाटे तीनचाकी रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते. मुंबई-आग्रा महामार्गावर (दि. 13) गुरुवारी पहाटे तीन वाजे सुमारास नासिक हुन चांदवड कडे एम एच 15 एफ यु 3670 या क्रमांकाची तीन चाकी रिक्षा जात असताना पाचोरे फाटा जवळ कोकाटे वस्ती समोर पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर रिक्षा मे दोन-तीन पलटी घेऊन अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळतात शिरवाडे वडनेर चौफुलेवरील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांना अंतर्गत 24 तास विनामूल्य कार्यरत सेवा करीत असलेली रुग्णवाहिका जखमींच्या मदतीला धावून गेली. या अपघातामध्ये कृष्णा सोनवणे, गणेश शिलावट, संगीता शिलावट, शांताबाई शिलावट, अर्जुन शिलावट सर्व राहणार गोरेवाडी जेल रोड नाशिक येथील असून हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे या रुग्णवाहिकेमुळे त्यांचे प्राण वाचले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *