September 8, 2024
 प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे डॉ. विजय भटकर यांचा जन्मदिवस साजरा
Amazon
शैक्षणिक

 प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे डॉ. विजय भटकर यांचा जन्मदिवस साजरा

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे डॉ. विजय भटकर यांचा जन्मदिवस संगणक दिन म्हणून साजरा करण्यात आला.

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे विद्यार्थ्यांनी कम्प्युटर असेंबल डीएससेम्बल केले, डिजिटल भेट कार्ड बनवले, तसेच संगणकाच्या विविध भागांची माहिती व त्यांचे कार्य समजावून घेतले.माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर यांचा जन्मदिवस संगणक दिन म्हणून साजरा करण्यात आला

त्यांच्या भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ते भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्त केलेल्या शासकीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहेत आणि इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य किंवा अनेक पदांवर त्यांना कार्य करण्याचा बहुमान प्राप्त झाला असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत अशा या भारतभूमीच्या रत्नाचे ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेत उपक्रम राबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *