October 18, 2024
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजप्रबोधनास द्यावे प्राधान्य : डॉ.नाडकर्णी
Amazon
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजप्रबोधनास द्यावे प्राधान्य : डॉ.नाडकर्णी

– जागतिक आरोग्य दिनानिमित्त भोसला कॉलेजमध्ये साधला संवाद


नाशिक- मानसशास्त्रांसारख्या विषयांत पांरगत होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायांचे ज्ञान आत्मसात करून आपला स्वतःचा यशस्वीपणे व्यवसाय जरूर थाटावा पण त्याजोडीला आपण मिळवलेल्या ज्ञानाद्वारे समाज प्रबोधन,जनजागृती करण्यासाठीचा त्याचा वापर व्हावा,अशी सूचना प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी केली.


भोसला मिलीटरी कॉलेजच्या मानसशास्त्र विभागातर्फे आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त झालेल्या मनाचा मनाशी संवाद या संवादसत्रात डॉ.नाडकर्णी बोलत होते. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे,कॉलेज कमिटीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर,प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ.डी.पी.पवार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री.देशपांडे यांच्याहस्ते डॉ. नाडकर्णी यांचा तर प्राचार्य डॉ.कुलकर्णी यांच्याहस्ते सौ.पुष्पा चोपडे,आदिती भार्गवे, डॉ.दिपश्री ततार,दिशा पाठक यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.गोविलकर यांनी मनाची भूमिका विषद केली.


डॉ.नाडकर्णी यांनी व्यवहार,मानसशास्त्र आणि तत्वज्ञान यातील फरक सांगितला. ते म्हणाले,व्यवहारात आपण विचार,बुध्दी,भावना,वर्तन,प्रेरणा या बाबींना तर मानसशास्त्रात आज न्युरो सायन्सकडे वेगवेगळ्यापध्दतीने पाहिले जात आहे. वैद्यकीय,विज्ञानात मन हे मज्जातंतु पेशींवर आधारीत आहे. वैज्ञानिक व्याख्यानात मुर्त-अमुर्त स्वरूपातील घटक लक्षात घेता येतील, तर त्वज्ञानात भावना या अर्थाने वापर होतो. बुध्दी,भावना एकत्र आल्या तर त्यातून नक्कीच चांगले घडते.एखादा विचार व्यक्त करतांना त्यासंदर्भातील प्रतिक्रीया आणि प्रतिसाद याचा देखील विचार आपणास करता येतो


भोवऱ्यांभोवती गुंफले सारे
मन,विचारांचे महत्व सांगतांना डॉ.नाडकर्णी यांनी संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या भोवऱ्यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, मनाची स्थिरता ही स्थितीशी नव्हे तर ती गतीशी आहे. विचार,भावना,वर्तन एकत्रित होते तेव्हामन स्थिरता येते. हे तीन घटक गतीमान झाले तर त्यास मानसिक आरोग्य म्हणता येईल. मन हे लांबून धबधब्यासारख्या दिसणाऱ्या रेषेसारखे दिसते तर जवळ गेल्यावर त्याचे विक्राळ,खरे रूप पहायला मिळते. याचप्रमाणे जे बाहेर स्थिर असते ते आत गतीमान दिसते. स्वयंकेंद्रीत आणि सर्वकेंद्रीत प्रेरणा याचा खेळ हा चालुच असतो. तो भोवऱ्यांप्रमाणे असतो. भोवऱ्यांला दोरी बांधून तो सोडला कि गती घेतो,दोरी ढिली झाली की भोवरा पडतो, त्याचप्रमाणे. मन विचार हे डळमळीत झाले तर परिस्थिती बदलते. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे दिली. सौ.चोपडे, भार्गवे आणि पाठक यांनी विविध प्रसंग सादर करत मानसशास्त्राचे महत्व पटवून दिले. दुसऱ्या सत्रात डॉ. वृश्नित सौदागर यांनी विविध उदाहरण देत जीवनात मानसिक आरोग्य कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन केले. शर्मिला भावसार यांनी सुत्रसंचालन केले. सौ.उपासनी यांनी परिचय करून दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *