November 27, 2024
इडली विक्रेत्याकडे सापडल्या पाच लाखांच्या बनावट नोटा
Amazon
क्राईम ताज्या बातम्या

इडली विक्रेत्याकडे सापडल्या पाच लाखांच्या बनावट नोटा

नाशिक – शहरात एका इडली विक्रेता व्यक्तीकडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. मुंबई नाका पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. यामागे बनावट नोटा विक्री करणारी टोळी कार्यरत आहे का याचाही तपास केला जातोय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील मुंबई नाका भागातील भारत नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मलायारसन मदसमय ( वय 33 मुळ राहणार तामिळनाडू ) या इडली विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 500 रुपये किमतीच्या 40 नोटा, तर 2000 रुपये किमतीच्या 244 बनावट नोटा, मोबाईल असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयित मलायारसन हा गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता. त्याने या नोटा आणल्या कुठून व यामध्ये अजून कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *