धुळे : शहरात गेले महिन्या भरापासून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार सुरू आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठा विरोधात आज धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आला. साक्री रोडवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर रास्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती .येत्या आठवडाभरात धुळे शहरातील विजेचे दुरुस्तीचे कामे युध्दपातळीवर पुर्ण करून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा या वेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, मा.आ.प्रा.शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, हेमाताई हेमाडे, जयश्री वानखेडे, संघटक गुलाब माळी, भरत मोरे ,संदीप सुर्यवंशी, लखन चांगरे, अजय चौधरी आदी उपस्थित होते.