मुंबई : हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांचा जो भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे. त्या भागातील शेतकरी माझ्याकडे आले होते. भीमा पाटस कारखान्याचे आजी माजी संचालक माझ्याकडे येत आहेत. शेकडो कोटींचा भ्रष्टाचार राहुल कुल यांनी त्या कारखान्यामध्ये केला आहेत. सरळ सरळ मनीलॉंड्रिंग आहे. त्या पैशाचा हिशोब न देणं हे सगळं मी या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन वेळा पाठवलं आहे. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे. यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे की, आपल्या महाराष्ट्रातल्या सहकार कारखान्यामध्ये सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरु आहे. आपण यात लक्ष घालावेत. त्यांनी मला अद्याप वेळ दिली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मध्यंतरी एक वक्तव्य ऐकलं होतं, मी गृहमंत्री झाल्यामुळे काही लोकांना अडचण होत आहे. खासकरुन भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या. तरी ही काही कारवाई झाली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण झाली नसुन त्यांना संरक्षण मिळाले आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.