ठाणे : बारसू सलगाव ही जागा सरकारने रिफायनरी साठी शोधले आहेत. पण त्या पंचक्रोशीतील सर्वांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मच्छीमारी होते. त्या ठिकाणी छोटे स्थानिक शेतकरी आहेत. आणि जेवढी ग्रामस्थ बाधित होतात , त्यापैकी सगळ्या ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध केला आहे. आता शंभर टक्के लोकांचा विरोध असताना एखादी जबरदस्तीने रिफायनरी किंवा उद्योग तिथे आणायचा हे चुकीच आहे असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जात आहे , कोणावर गुन्हे दाखल केले जात आहेत , कोणावर अतिरेकी असल्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. एटीएस तर्फे चौकशी केली जात आहे. हे काय आहे कळत नाही मला? पत्रकारांना हात धरून बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं इथे परत दिसू पण नका. म्हणजे आपण कुठल्या राज्यव्यवस्थेत राहत आहोत. सरकार म्हणजे महाराष्ट्राचा मालक नाही आहे. तर महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी राज्याचे ते प्रमुख आहेत असे आव्हाड म्हणाले.