February 21, 2024
अजित पवारांच्या सासरवाडीतही लागले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
Amazon
महाराष्ट्र

अजित पवारांच्या सासरवाडीतही लागले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

धाराशिव : तालुक्यातील तेर म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची सासरवाडी. नुकतीच मुलाखतीत अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले. आता पवारांच्या सासरवाडीतील कार्यकर्त्यांनी देखील मुख्य चौकात अजित पवारांचं भावी मुख्यमंत्री अशा आशयाचं भलं मोठं बॅनर लावलं आहे. तसेच काकांना अर्थात संत गोरोबा काकांच्या समाधीचा अभिषेक करून साकडं घातलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *