September 8, 2024
राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या नेत्यांची वाहने अडवली : ॲड यशोमती ठाकूर
Amazon
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या नेत्यांची वाहने अडवली : ॲड यशोमती ठाकूर

अमरावती : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरात ला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरत ला रवाना झाले होते. त्यावेळी अशीच चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला. सुरत ला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलीसांनी अडवली. त्यावेळी पोलीसांनी लाइव्ह स्ट्रीमींग कॅमेराधारक दोन कर्मचारी यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचं थेट लाइव्ह गांधी नगर मध्ये होतं आहे. आमचा नेता गुजरात ला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीस जाऊ दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *