October 18, 2024
कंपनी मॅनेजरचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू
Amazon
महाराष्ट्र

कंपनी मॅनेजरचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू

नाशिक : मुंबई महामार्गावरील हॉटेल अंगण जवळ( दि 23) रात्री एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला (Assault) केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असता, त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचे त्यात निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) रोहिणी पावडर कोटिंग कंपनीत (Rohini Powder Coating Company) योगेश सुरेश मोगरे (Yogesh Suresh Mogre) (39 रा. इंदिरानगर) हे व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते.मुंबई महामार्गावरील सर्विस रोड वरून आपल्या कार ने ते जात होते त्यावेळी त्यांच्या वाहनाला हल्लेखोरांनी समोरून अडवले व त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांची चारचाकी घेऊन घटना स्थळावरून मुंबई च्या दिशेने पलायन केले.

रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मोगरे यांना उपचारार्थ पाथर्डी फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात येथील रिक्षा चालकांनी दाखल केले. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सर्व सुविधा असलेल्या एका खाजगी रुग्णालयात हलविले ; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Deputy Commissioner of Police Chandrakant Khandvi), इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे व गुन्हे शाखेच्या शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनीही घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील हल्लेखोरांना शोधून अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मोगरे यांच्या पत्नीने याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दरम्यान, मारेकऱ्यांनी मोगरे यांची पळवलेली चारचाकी अस्वली रस्त्यादरम्यान बेवारस सोडून दिली होती. गाडीमध्ये मोगरे यांच्या वस्तू जशाच्या-तशा असल्याने सदरचा खून हा लुटमारीच्या इराद्याने झाला नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *