बीड : कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडले नाही. उलट अडत व्यापाऱ्यालाच अठराशे रुपये द्यावे लागले.
बीड तालुक्यातील भागवत डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा 70 हजार रुपये केला. त्यातून 120 गोण्या भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हाती काहीच आले नाही. शिवाय डांबे यांना जवळीलच 1832 रुपये द्यावे लागले. त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टाच पाहायला मिळाली.