September 8, 2024
अमरावतीत शिधा पोहचलाच नाही; रेशन दुकानांना टाळे
Amazon
महाराष्ट्र

अमरावतीत शिधा पोहचलाच नाही; रेशन दुकानांना टाळे

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या पर्वावर आनंदाचा शिधा मिळेल, अशी घोषणा केली होती.गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. तरी अमरावती जिल्ह्यामधील एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधाच पोहचला नाही. त्यामुळे दुकानात शिधावाटप झालं नाही. आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानात गर्दी करत असल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात 1914 रेशन दुकान आहेत. 5 लाख लाभार्थी आहे. सद्या केवळ धारणी तालुक्यात फक्त 3220 रवाची पॉकेट पोहचले आहेत. यासोबत साखर,चना आणि पामतेल पोहचले नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे. आनंदाचा सुद्धा हा दोन वेळा नागरिकांना मिळणार आहे अशी देखील माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.आनंदाचा शिधा घेण्यासाठी मोठ्या आशेने आलेल्या गोरगरीब कुटुंबांच्या निराश होऊन वापस जावं लागत आहे. परंतु दुकानात शिधाच आला नसल्याने ग्राहकांना निराशा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *