कल्याण : अमरावती टेक्स्टाईल पार्क 1200 एकर मध्ये हा मेगा टेक्स्टाईल पार्क होईल, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि विकास होईल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाइव्ह होईल असा प्रकल्प प्रधानमंत्री यांनी मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण मध्ये म्हणाले. अंबरनाथ हा जिव्हाळ्याचा विषय आहे, शिवमंदिर ही आपली श्रद्धा आणि अस्मिता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अंबरनाथकरांना भेटायला आलो, शिवमंदिरात दर्शन घेतलं, मनापासून आनंद झाला, समाधान झालं. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली सुरू झाला, या फेस्टिव्हल मुळे अंबरनाथची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मोठ्या शहारांसोबत या छोट्या शहराची स्पर्धा सुरू आहे, चांगली प्रगती होतेय, राज्य सरकारकडून अंबरनाथकरांची काळजी घेतोय, शहर बदलतंय, वाढतंय, विकसित होतंय, सोयीसुविधा मिळतायत ही समाधानाची बाब आहे. मंदिराचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करू, पैसे कमी पडणार नाही. गडकोट, प्राचीन मंदिरं यांचं जतन संवर्धन करणं हे आमचं काम आहे. जयसिंघानी प्रकरणाचा तपास होत आहे, उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात निवेदन दिलं आहे. जयसिंघनी हा महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षात गेला आहे, याचा सखोल तपास होईल. जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांच्या पाठीशी कुणी असेल तर पोलीस सक्षम आहे. राजकारणात कुटुंबियांपर्यंत कुणी जाऊ नये असे संकेत असतात असे शिंदे म्हणाले.