November 21, 2024
त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेची मागणी
Amazon
क्राईम

त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेची मागणी

नाशिक जिल्ह्यातील सर्वच आदिवासी मुलाच्या निवासी आश्रम शाळेत नियमितपणे आरोग्य तापसणी करण्याची मागणी
शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थी ठरला बळी
दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाअधिकारी,तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदन देण्यात आले,
त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी सेवा समितीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेणाऱ्या निवृत्ती बाळू चावरे या विद्यार्थ्यांचा शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे
शाळा प्रशासन मुलांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेतली असती तर या कोवळ्या मुलाचा जीव वाचला असता मात्र शाळेकडून हलगर्जीपणा झाला म्हणूनच त्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला आहे या आश्रम शाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी होत होती की नाही याची देखील आपण चौकशी करावी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित व शासकीय निवासी आश्रम शाळा असून त्या ठिकाणी देखील आरोग्य तपासणी बाबत चौकशी व्हावी जेणेकरून असे मृत्यू होणार नाही
तसेचत्र्यंबकेश्वर मधील आश्रम शाळेतील मृत्यूची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली
यावेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम लचके,जिल्हा सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उप सचिव मुरलीधर जाधव, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *