बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुलीवर कांदा भजे तळून आंदोलन करण्यात आले. शासनाची गॅस दरवाढ आणि कांद्याला कवडीमोल भाव याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी चुलीवर कांदा भजी तळून आणि सिलेंडरला फुलांचा हार घालून दरवाढीचा निषेध नोंदवला. या लक्षवेधी आंदोलनाची जिल्ह्याभरात चर्चा रंगते आहे. गॅस दरवाढीचा ग्रामीण भागात सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
BYTE – गणेश ढवळे, आंदोलनकर्ते