यवतमाळ : शेतकर्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मार्चपासून यवतमाळ येथील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम आदमी पक्षाने कापूस जाळून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
खरीप हंगामात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तूर, कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्यांनी अजूनही कापूस घरीच ठेवला आहे. जीएसटी लादुन शेतकर्यांची लुट करण्यात येत आहे. शेतकर्यांची चोहोबाजूने लुट करण्यात येत असताना सरकारकडून दिलासा देण्यात येत नाही. शेतकर्यांच्या न्याय मागणीसाठी राज्यात आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. सरकारने दखल न घेतल्यास हा वानवा राज्यात पेटण्याचा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला