October 15, 2024
उच्चशिक्षित मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यास राबोडी पोलिसांना यश
Amazon
क्राईम

उच्चशिक्षित मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यास राबोडी पोलिसांना यश

ठाणे : रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना ठाणे कंट्रोल येथून इसम नामे विबोध दत्ताराम जाधव वय २६ राहणार. अग्रसेन टॉवर रूम नं ५०४ हा आत्महत्या करत असल्याचा कॉल दिला. तात्काळ सदर ठिकाणी गेले असता वरील नमूद इसम हा आतून कडी लावून घरातील पंख्याला फास लावून घेत होता. तेवढ्यात या ठिकाणी पोहचलेले अमलदार हे आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस करून त्यांच्याकडून फ्लॅटची चावी घेऊन लगेच दार उघडले असता सदर व्यक्ती हा पंख्याला फास लावून घेत होता लगेच त्याला खाली घेऊन त्याच्या गळ्यातील दोरी काढून त्याच्या वडिलांना माहिती दिले. वडील लगेच सदर ठिकाणी आले त्यानंतर घडलेला प्रकार त्यांना सांगून मुलाला वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *