September 8, 2024
नाशिक | शुल्लक कारणावरून खून करणाऱ्या बाप लेकांना जन्मठेपेची शिक्षा; दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास
Amazon
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिक | शुल्लक कारणावरून खून करणाऱ्या बाप लेकांना जन्मठेपेची शिक्षा; दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास

नाशिक: सातपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर २०२० साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तिघा संशयितांना न्यायालयाने जन्मठेपेची आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातील संशयित हे बापलेक आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सातपूर पोलीस ठाण्याच्या हददीतील हनुमान मंदिराजवळ विश्वास नगर येथे दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी मयत संबलदेव यादव ३० याचा साला अमरजित यादव याला विशाल यादव याने फटाके फोडल्याचे कारणावरून शिवीगाळ धक्कबुक्की केली म्हणुन त्याचा जाब विचारण्यासाठी विशाल यादव याचे घरी गेले असता त्याचे शेजारी राहणारे संशयित आरोपी सुकट मोहोदर चौव्हाण ५८, संदिप सुकट चौव्हाण २२, संजय सुकट चौव्हाण २५ सर्व रा. विश्वास नगर सातपुर यातील आरोपी संदीप चव्हाण याने जोरजोरात ओरडुन हल्ला हुल्ला क्या करते हो आवाज बंद करो असे सांगितले.

त्यावेळी अमरजित यादवने हमार आपस का मामला है आप बिचमे बोलने वाले कोन हो याचा आरोपीस राग आल्याने त्याने घरात जावुन बॅट आणुन सुकट चौव्हाण याने संबलदेव याला पाठीमागुन घरून ठेउन संदिप याने बैट मारली तसेच संजय चव्हाण याने दुसरी बॅट आणुन डावे डोळयावर मारली त्यानंतर तो चक्कर येऊन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे संशयित आरोपी पळुन गेले होते. या गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक टी एम राठोड यांनी करीत संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. संशयित आरोपींविरूध्द् जिल्हा व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल करून खटल्याची सुनावणी सुरु झाली होती. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०१ व्ही एस कुलकर्णी यांनी या गुन्हयातील आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीना भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन सपोउनि डी एस काकड, पोना वाय डी परदेशी पोहवा. आर एन शेख यांनी सदर गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *