September 8, 2024
सातारा | धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
Amazon
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारा | धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

सातारा: कराड तालुक्यातील मुंढे येथे धान्यातील पावडरीच्या वासाने सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तनिष्का अरविंद माळी (7) आणि श्लोक अरविंद माळी (3) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्यामुळे श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. नातेवाईकांनी दोन्ही मुलांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मुंढेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *