September 8, 2024
देवळा I बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारा देवळा पोलिसांच्या ताब्यात
Amazon
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवळा I बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारा देवळा पोलिसांच्या ताब्यात

देवळा : अवैधरित्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या कळवण तालुक्यातील इसमास देवळा पोलिसांनी निवानबारी परिसरातून अटक केली आहे. देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम बिबटयाची कातडी जवळ बाळगुन तस्करी करीत आहे. हा निवाणेबारी ता. देवळा येथे हि कातडी विक्रीसाठी घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पो.उप.निरी महेश शिंदे, पो.हवा गवळी, ज्योती गोसावी, सुरेश कोरडे, चालक शिंदे यांनी वेगवेगळी वेशभुषा करून खाजगी वाहनाने सदर संशईत इसम आल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी या इसमाकडे बिबटया हया वन्य प्राण्याचे कातडी असल्याची खात्री झाल्याने या इसमास ताब्यात घेतले. व त्याचे ताब्यातील बिबटया हया वन्य प्राण्याचे कातडी घेवुन त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव राजु वाळु जगताप वय ३२ धंदा शेती रा. आळंबे ता.कळवण जि.नाशिक मुळ रा. अर्जुनसागर पोस्ट काठरा ता. कळवण जि.नाशिक असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *