AMRAVATI : अमरावती जिल्ह्यात गेल्या 20 वर्षापासून सुरू झालेलं शेतकरी आत्महत्याच सत्र अद्याप कमी झालेलं नाही, यावर्षी जानेवारी महिन्यात 15 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात आहे. दोन दिवसात एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मागील वर्षी 2022 मध्ये वर्षभरात राज्यात सर्वाधिक 321 शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या, तर या ही वर्षी शेतकरी आत्महत्येत राज्यात अमरावती अव्वल राहणार का ही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा सरकारकडून मिळत असलेली अल्पमदत त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे. अमरावतीत वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय हा चिंतेचा आहे. त्यामुळे हे सरकार याकडे लक्ष देतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे