NAGPUR: बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. युती तोडून काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसुन युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जवाबदार हे फक्त उध्दव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे. सावरकरांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली, आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही.
निवडणुका या लागणारच आहे, ते कोणाच्या हाती नाही, 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर निवडणुका लागणार आहे. आम्ही निवडणुका घाबरत नाही, मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू, उद्धव ठाकरे यांचा गरड ओकण्याला जनता धडा शिकवेल, केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहे. ठाकरे यांच्या जवळचे 50 आमदार निघून गेले, राज्यपाल यांनी संविधानिक पद्धतीन नियमात राहून त्याचं पालन केले. पण महविकास आघाडीचे सरकार गेल्यानं त्यांना दुःख झालं आहे, नियम बाह्य काम राज्यपाल यांनी होऊ दिले नाही, अतिशय उत्तम काम केले, शिवनेरी किल्यावर जाऊन दर्शन घेतलं, विकास कामाला छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला, शिवाजी महाराजांची प्रेरणा मानून राज्यपाल यांनी काम केले, एका वक्तव्यामुळे राज्यपालांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवता येत नाही. महाराष्ट्राला ऊर्जा देणारे होते.
त्यांना फक्त जामीन मिळाला आहे. नागपुराता येण्याची परवानगी मिळाली. कोर्टाचा निकाल लागेल, त्यांनी जल्लोष करावा हा त्यांचा प्रश्न, जनतेच्या कोर्टात घटनापिठाचे आरोपी आहे निकाल लागत नाही तोपर्यंत ते आरोपी आहे जल्लोष करून खूप काही मिळवलं असं नाही. जनता निर्णय करेल. शिवसेनेचे नेते म्हणतात नाना पटोले मुळे सरकार पडलं. पटोले म्हणतात कोश्यारीमुळे सरकार पडलं.सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कोणीही बोलू नये. जो निकाल येईल तो मान्य करायल पाहिजे, जो निकाल येईल तो मान्य करू, उद्धव ठाकरे हे निकाल लागण्यापूर्वी निकाल लागल्याची भाषा करत आहे, किंचित सेनेचे लोक सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आला तर योग्य असे म्हणतात विरोधात गेला तर टीका करायला तयार होतात.