November 21, 2024
MUMBAI | शशिकांत वारिसे हे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपत होते – खा. संजय राऊत
Amazon
ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

MUMBAI | शशिकांत वारिसे हे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपत होते – खा. संजय राऊत

  • पत्रकार शशिकांत वारिसे यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या झाली तो पत्रकार कोकणातल्या रिफायनरी विरोधात अनेक प्रश्न घेऊन आवाज उठवत होते.
  • रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी कवडेमोल किंमतीत जमिनी घेतल्या ते जमीनदार कोण आहेत , या संदर्भातली माहिती देण्यास सुरुवात केली होती.
  • रत्नागिरीतील काही राजकारणी रिफायनरी समर्थक यांचा या जमिनी घेण्यात कसा हात भार आहे, या संदर्भात त्यांनी लिहायला सुरुवात केली होती.
  • त्यामुळे ते या भागातल्या राजकारण्यांच्या डोळ्यात खूपत होते.
  • पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी रिफायनरी आणणारच याची सुपारी घेतली होती.
  • आंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या.
  • आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली.
  • हा योगायोग समजायचा का ?
  • जे आपल्या विरोधात बोलतील त्यांना ईडी आणि सीबीआय च्या फेऱ्यामध्ये तुरुंगात डांबलं जात होतं , आता तर गुंडशाही सुरू झाली.
  • कोकणामध्ये पत्रकारितेला वारसा आहे आणि त्या कोकणात एका पत्रकाराची हत्या झाली.
  • श्रीधर नाईक , सत्यविजय भिसे , अंकुश राणे सातत्याने शिवसैनिकांवर झालेले हल्ले असतील आणि काल झालेली हत्या असेल हे एकाच मालिकेतील आहेत.
  • ज्या आरोपीला अटक केली आहे, त्या आरोपी मागील खरे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घ्यावा.
  • या मागच्या सूत्रधारला देखील त्यांनी अटक केली आहे. कोकणामध्ये पुन्हा एकदा हत्याच सत्र सुरू झालेला आहे.
  • मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाला भेटण्याची वेळ मिळत नाही आहे. वारंवार वेळ मागूनही वेळ दिली जात नाही.
  • म्हणून आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
  • आज आमचे नेते हे वारिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील आणि पुढील भूमिका ठरविण्यात येईल.
  • केंद्रीय उपमुख्यमंत्र्यांनी विशेष टीम येथे पाठवावे आणि वारीसे यांचीच नाही तर या आधी झालेल्या चार-पाच हत्यांचा देखील तपास करावा.
  • रिफायनरी समर्थकांनी या ठिकाणी आसपास जमिनी घेतलेल्या आहेत या जमिनी कोणाच्या आहेत याची यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत.
  • पोलिसांवर दबाव आहे जिल्हाधिकारी आणि रिफायनरी प्रमुखांना आदेश देण्यात आला आहे की जे कोणी विरोध करतील त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा.
  • आज विनायक राऊत आणि राजन साळवे वारसे यांच्या कुटुंबीयांना भेटत आहेत आणि लवकरच आम्ही सुद्धा तेथे जाऊ.
  • शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखांची मदत द्यावी असं आवाहन मी उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
  • सरकारने केलेला हा खून आहे. मला देखील धमक्यांचे फोन आले शशिकांत वारीसे यांचा मुद्दा जर उचललात तर तुमचा शशिकांत वारीसे करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *