September 8, 2024
BULDHANA | पोलिस वर्दीत आलेल्या रविकांत तुपकरांना आत्मदहनापासुन पोलिसांनी रोखले
Amazon
ताज्या बातम्या महाराष्ट्र

BULDHANA | पोलिस वर्दीत आलेल्या रविकांत तुपकरांना आत्मदहनापासुन पोलिसांनी रोखले

BULDHANA : कापूस आणि सोयाबीन दरवाढ आणि रखडलेली पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आज 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची वर्दी घालुन रविकांत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रॉकेल अंगावर घेताना आत्मदहनाचा प्रयत्न करीत असतानाच वेळीच पोलिसांनी त्यांना रोखले.यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळापासुनच पोलीस प्रशासनाने 250 कर्मचारी – अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात केले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये यापूर्वी बुलढाणा शहरामध्ये हजारो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढला यानंतर मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये जलसमाधी प्रयत्न करीत असताना सरकारने त्यांना बोलणी करण्यासाठी बोलावले होते. यामध्ये

त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून दिल्यानंतरही त्या पूर्णत्वास गेल्या नसल्याने शेवटी 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबई येथील स्टॉक एक्सचेंज कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा 8 फेब्रुवारी रोजी तुपकरांनी दिला होता.तेव्हापासून रविकांत तुपकर हे भूमिगत झाले होते. दरम्यान आज अचानकपणे ते पोलिसांच्या वर्दीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रगटले.मागण्या मान्य करा अन्यथा मला गोळी घालून शहीद करा अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *