September 15, 2024
९ हजारांची लाच घेताना उत्पादनशुल्क विभागाचा अधिकारी जेरबंद
Amazon
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

९ हजारांची लाच घेताना उत्पादनशुल्क विभागाचा अधिकारी जेरबंद

निफाड-बार चालकाकडून 9 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह दोन खासगी व्यक्ती, अशा तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली असून, निफाड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश संजय गायकवाड या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह बारचालकांकडून वसुलीसाठी मध्यस्थी असलेले पंडित रामभाऊ शिंदे, प्रवीण साहेबराव ठोंबरे असे तिघा लाचखोरांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड शहरातील हॉटेल व्यवसायिक असलेल्या तक्रारदाराचे येवला रोडवर तीन बार ॲण्ड रेस्टॉरंट आहेत. बार ॲण्ड रेस्टॉरंटची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून केली जात असते. या नियमित तपासणीमध्ये हॉटेल्समधील कामाच्या त्रुटी न काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान लोकेश गायकवाड तसेच वसुलीसाठी मध्यस्थी असलेले दोघे खासगी व्यक्ती संशयित शिंदेआणि  ठोंबरे यांनी एका हॉटेलचे चार हजार रुपये प्रमाणे 12 हजार गेल्या 3 फेब्रुवारी रोजी मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हॉटेलचे मिळून 9 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने निफाड येथे सापळा रचत लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *