AURANGABAD– सध्या महापालिका प्रशासनाकडून जी ट्वेंटी परिषदेच्या नावाखाली विविध कामे केली जात आहेत. परंतु या परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना रस्त्यावर हातगाडी दिसू नये यासाठी गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारली जात आहे. गेल्या 1259 दिवसापासून व्हिडिओकॉन कंपनीतील 340 कामगार कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहे. व्हिडिओकॉन कंपनी बंद पडली, कामगारांचा पगार थकला म्हणून कामगारांचे काम गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सरकार शासनाकडून न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे ते वर्षानुवर्ष या ठिकाणी उपोषणाला बसले होते. परंतु आज जी ट्वेंटी च्या नावाखाली मनपाचे अतिक्रमण पथक त्यांच्या उपोषण स्थळी जाऊन तेथील त्यांचा मंडप काढून टाकत चटईवर बसण्यास मजबूर केले. अशा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो असे व्हिडिओकॉन एम्प्लॉज युनियनचे अध्यक्ष गजानन खंदारे यांनी सांगितले. ते म्हणाले की जी ट्वेन्टी शहरात येईल इतर पाहुण्यांना तुम्ही शहर स्वच्छ सुंदर बनवून दाखवत आहे. परंतु नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या पोटावर लाथ मारू नका. शहरांमध्ये हात गाडी उपोषण इत्यादी रस्त्यावरचे आपण काढत आहात, पण गरिबांचा ही विचार करा असे म्हणाले