October 18, 2024
ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली ५० लाखांची चोरी
Amazon
क्राईम महाराष्ट्र

ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली ५० लाखांची चोरी

सोलापूर : मालकाबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला म्हणून, ड्रायव्हरने काटा काढण्याचा निर्णय घेतला. मालक परगावी गेल्याची संधी साधून त्याने घरातील ५० लाख ९० हजारांची रोख रक्कम व २१ तोळे सोने चोरून नेले होते. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आले. न्यायालयासमोर उभे केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उमेश यादव असे अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. उमेश यादव हा आशिष पद्माकर पाटोदेकर यांचा ड्रायव्हर म्हणून कामाला होता.गेल्या अडीच वर्षांपासून तो काम करीत होता.आशिष पाटोदेकर हे ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त पुणे येथे गेले होते.

१ फेब्रुवारी रोजी पहाटे आशिष पाटोदकर हे घरी आले असता, कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ४५ लाख रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले.नंतर त्यांना २१ तोळे सोने आणि पाच लाख ९० हजार ५०० रुपयेही चोरीला गेल्याचे लक्षात आले.याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. चोरीप्रकरणी ड्रायव्हरला अटक केल्यानंतर त्याच्याजवळ ५० लाख ९० हजार ५०० रुपयाची रोख रक्कम मिळून आली. राहिलेले २१ तोळे दागिने त्याने सोलापुरातील भाड्याच्या घरात जिन्याच्या फरशीखाली ठेवली होते,तेही काढून दिले.पैसे आणलेले रिकामे पोते गादीमध्ये लपवून ठेवले होते तेही काढून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *