June 16, 2024
SOLAPUR | मृत हरणांना प्राणी मित्रांनी वाहिली श्रद्धांजली
Amazon
महाराष्ट्र

SOLAPUR | मृत हरणांना प्राणी मित्रांनी वाहिली श्रद्धांजली

Solapur – आजपर्यंत आपण मोठंमोठ्या व्यक्तींच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी झालेल्या शोकसभा पहिल्या असतील. मात्र, सोलापुरातील प्राणीमित्रांनी चक्क हरणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेच आयोजन केले होत. कांही दिवसांपूर्वी सोलापूरच्या केगाव उड्डाणपुलावरून खाली कोसळून तब्बल 14 हरणांना जीव गमावावा लागला होता. त्या हरणांना न्याय मिळावा म्हणून सोलापुरातील प्राणी प्रेमी त्याच उड्डाणपुलाच्या खाली एकत्र येत शोकसभेचे आयोजन केल होत. यावेळी मेणबत्त्या पेटवून आणि फुले वाहून या मुक्या जीवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या भिंतीवर ‘विकासाचे मुकबळी’,’तुमचा महामार्ग झाला, आमचा जीव गेला!’ अशा आशयाचे मजकूर लिहून व्यवस्थेचा निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *