NAGPUR : अंतराष्ट्रीय हिंदू परिषदचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर आहेत.आज नागपूरात पत्रकार परिषदे घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर 50 वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या. जनसंख्येचा असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे. सध्या देशात भाजपचे बहुमताचे सरकार आहे आणि एक वर्ष बाकी आहे. या एका वर्षात केंद्र सरकारने हा कायदा आणावा. आणि काशी मथुरा मंदिर बनवण्याचा कायदा देखील बनवावा.अॅन्टी लव जिहाद हा कायदा बनला पाहिजे. अशी या सरकारला विनंती आहे.
ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नाही.जनसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर, ५० वर्षानंतर ही बनवलेल्या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो.महाराष्ट्रातील हिंदूंच्या आंदोलनावर तोगडिया म्हणाले की, सरकार नाही आणि आंदोलन झाले तर समझू शकतो.सत्तेत असुन आंदोलन करतात ही हास्यास्पद बाब आहे.महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन कायदा होऊ शकते.उपमुख्यमंत्री यांच्या घरी बसुन कायदा बनवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.